शिरपूर शहरातील करवंद नाक्यावर गुप्तपणे सुरू असलेला सेक्स रॅकेट अखेर 30 ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या पोलिसांच्या कारवाईत उघडकीस आला आहे.या कारवाईत दोन महिलांना रंगेहात ताब्यात घेतले असून, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सदरची कारवाई पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून एपीआय हेमंत पाटील, डीबी पथक,आणि दामिनी पथकाने केली.