भगतसिंगवार्ड मरारटोली येथे फिर्यादी जरूद्दीन भाटी याने आपल्या घराच्या शेळ्या त्यांच्या घरासमोरील नत्थू अग्रवाल यांच्या खाली प्लॉटवर बांधले असता दि.26 ऑगस्ट रोजी 12 वाजेच्या दरम्यान पांढऱ्या रंगाची शेळी किंमत 10 हजार व दि.27 ऑगस्ट रोजी काळ्या रंगाची शेळी किंमत 10 हजार असा एकूण किंमत 20 हजार रुपये किमंतीच्या शेळ्या कोणीतरी अज्ञात इसमाने सुनामोका पाहून चोरी करून गेल्याने फिर्यादीच्या तक्रारीवरून दि.27 ऑगस्ट रोजी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास रामनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.