महासंसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी दुपारी १२.३० वाजता पत्रकारांशी बोलताना सांगितले की, आमची लढाई वैयक्तिक नसून वैचारिक आहे. यातून देशाला चांगले उपराष्ट्रपती मिळावेत, सशक्त लोकशाही घडावी आणि देश संविधानाच्या चौकटीत चालावा, अशी अपेक्षा आहे. कोणत्याही पक्षाशी आमची वैयक्तिक नव्हे तर वैचारिक लढाई असून, त्यातून भारतात एका चांगल्या उपराष्ट्रपतींची निवड व्हावी, ज्यातून एक सशक्त लोकतंत्र निर्माण होईल आणि हा देश संविधानाच्या चौकटीत चालेल, एवढीच आमची अपेक्षा आहे.