गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार नेर पोलीस ठाण्याच्या वतीने अवैधरित्या डीजे लावणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्यात आली. नेर शहरात तसेच ग्रामीण भागात धडक तपास मोहीम राबवितांना एकूण सहा डीजे वाहनावर दंडात्मक कारवाई करून तब्बल एक लाख 26 हजार रुपयाचा दंड वसूल केला.