शेतकरी बांधवांनी हंगामी पीक सोयाबीन कपाशी या पिकासाठी अहोरात्र कष्ट केले मात्र शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र असून अनियमित पाऊस हवामानातील अस्थिरता तसेच कीड रोगीचा प्रादुर्भाव यामुळे पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे खते बियाणे औषधी तसेच मजुरी यावर मोठा खर्च त्यांनी केला मात्र पिकाची हानी होत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे त्यामुळे त्यांना मदत देण्यात यावी यासाठी नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष विजय वाघमारे यांनी तहसीलदार यांना आज दुपारी तीन वाजता निवेदन सादर केले आहे.