अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर गावात काल शुक्रवार।दि.5 सप्टेंबर रोजी रात्री 10 च्या सुमारास एक भीषण अपघात घडला.गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या सोमेश्वर हॉटेलला अचानक आग लागली. या आगीत थोड्याच वेळात एकामागोमाग दोन गॅस सिलेंडरचे स्फोट झाले.स्फोट एवढा मोठा होता की संपूर्ण परिसर दणाणून गेला. या दुर्घटनेत हॉटेलचे मोठे नुकसान झालेच, पण शेजारच्या इतर दुकानांनाही मोठा फटका बसला.दुकानावरील पत्रे उडून गेली, तर अनेक साहित्य जळून खाक झाले.सुदैवाने, या घटनेत जीवितहानी झाली नसल्याचे