संसदेच्या पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्याला अपेक्षा होती हमीभावावर निर्णय होईल, तरुणांना रोजगाराच्या संधी मिळतील, संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदत मिळेल. पण विरोधक आणि सत्ताधार्यांनी लोकशाहीच्या मंदिरात फक्त तमाशा केला आणि देशातील जनतेच्या करोडो रुपयांचा ३७ तासात चुराडा केला.संसदेच्या कामकाजावर एका तासाला जवळपास दीड कोटी. यात खासदारांचे वेतन, भत्ते, संसद भवनाचा देखभाल खर्च समाविष्ट असतो.