उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांचे कागदपत्रे काही जणांनी तपासावेत, अशी मागणी केली आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी आज रविवार दिनांक 7 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी बारा वाजता सोशल मीडियाद्वारे व्हिडिओ शेअर करत टीका केली आहे. दरम्यान अजित पवार यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची कागदपत्र पहिले जनतेसमोर ठेवा, अशी टीका त्यांनी केली आहे.