अलीकडच्या काळात गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये पारंपारिक वाद्यांच्या ऐवजी डीजे चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला होता या डीजेच्या आवाजाचा लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला तसेच आजारी व्यक्तींना त्रास होतो. यासाठी वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी विविध गणेश मंडळांना भेटी देऊन तसेच शांतता समितीच्या बैठकीमध्ये डीजे चा वापर करू नये यासाठी प्रबोधन केले. तरी काही गणेश मंडळांनी गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी शहराच्या बाहेरून डीजे आणले. विनापरवाना डीजे आल्याबद्दल वाशिम शहर पोलिसांमध्ये जमा झाले.