मध्यरात्री काटोल पोलीस डायल 112 वर कॉल आला की काटोल मधील पोलीस स्टेशन व इतर तीन बिल्डिंग येथे बॉम्ब ब्लास्ट करणार आहे. या निनावी कॉल ने पोलीस यंत्रणा खळबळून जागी झाली. तात्काळ घटनेची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ यांना देण्यात आली. घटनास्थळी बीडीडी एस आणि श्वानपथक देखील पाचारण करण्यात आले परंतु घटनास्थळी काहीही आढळले नाही. कपिल नगर पोलिसांना देखील नागपूर ग्रामीण पोलीस मुख्यालय उडवून देतो अशा धमकीचा कॉल आला.