वडवणी तालुक्यातील कोठारबन गावात मंगळवार, दि. 23 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता नागरिकांनी थेट नदीच्या पुरात उतरून आंदोलन केले. आंबेडकर नगरातील नागरिकांच्या या निर्धारामुळे तहसीलदार यांनाही पाण्यात उतरून निवेदन स्वीकारावे लागले.गावाची लोकसंख्या हजाराहून अधिक असून, लहान मुलांना दररोज शाळेसाठी पुराच्या नदीतून जीव धोक्यात घालून जावे लागते. पन्नास वर्षांपासूनची पूल बांधण्याची मागणी अद्यापही रख