मागील 8 वर्षांपूर्वी आपल्या नातलगांना आपले जुने घर वापरण्यास दिले होते. नातलग 8 वर्षांपासून त्या ठिकाणी राहत होते. महिला आपल्या जुन्या घरी जाऊन त्यांना घर खाली करण्यासंदर्भात बोलली असता 5 जणांनी संगणमत करून महिलेला शिवीगाळ करीत मारहाण केल्याची घटना घडली. ही घटना 5 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास मौदी जुनी येथे घडली. या घटनेत कंचना देवचंद देवगडे (६५) या जखमी झाल्या.