चंद्रपूर जिल्ह्यातील सोमनाथ येथे सकाळी भांडी धुत असताना महिलेवर वाघाने हल्ला करून तिला ठार केल्याची घटना आज दिनांक 8 सप्टेंबरला पहाटे पाच वाजताच्या दरम्यान घडली. अन्नपूर्णा बिलोने असे मृतक महिलेचे नाव आहे सोमनाथ येथे यापूर्वीही वाघाच्या हल्ल्यात एका इसमाचा मृत्यू झाला होता तीन महिन्यात दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याने वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.