माकणी येथे पुरात वाहून गेलेल्या शेतकऱ्याची सुखरूप सुटका तालुक्यातील माकणी येथे पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या एका शेतकऱ्याला सुदैवाने जीवदान मिळाले आहे. दौलतराव गोपाळ डोंगरगावे असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते आता सुखरूप आहेत. ही घटना शिरूर ताजबंद ते माकणी रोडवरील पुलाजवळ दुपारी २ ते ३ च्या दरम्यान घडली. मिळालेल्या माहितीनुसार, दौलतराव डोंगरगावे हे आपल्या शेतातून घराकडे परत येत होते. त्यावेळी पुलावरून गुडघ्यापर्यंत पाणी वाहत होते.