बुलढाणा जिल्हा किसान सेना प्रमुख संदीप गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त रायपूर येथे दिनांक १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता आमदार संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत लोकप्रिय कीर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या भव्य कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष सौ. पुजाताई संजय गायकवाड, महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारणी सदस्य युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड आदी उपस्थित होते.