संत तुकडोजी वार्डातील प्राध्यापक कॉलनीत कारची मोपेडला धडक दिली यात मोपेडस्वार जखमी होऊन मोपेडचे नुकसान झाल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.प्राप्त माहितीनुसार स्वप्निल परचाके हा आपल्या मोपेड क्रमांक एम एच ३२ ए.ए.९४३७ने आपल्या आजीला घेऊन मावशीकडे जात असताना कार क्रमांक एम.एच.४०सि.ए.०८३८च्या चालकाने कार भरधाव वेगाने चालवित मोपेडला धडक दिली या अपघातात मोपेडस्वार स्वप्निल परचाके व त्याची आजी जखमी झाला व मोपेडचे नुकसान झाले यासंबंधी हिंगणघाट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.