मूल शहरातील मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरे दिवसेंदिवस वाढत असून, त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. याबाबत वेळोवेळी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले असतानाही अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. याविरोधात आता माजी उपाध्यक्ष नगर परिषद नंदकिशोर रणदिवे यांनी तीव्र संताप व्यक्त करत तात्काळ मोकाट जनावरांचा बंदोबस्त न झाल्यास नगर परिषदेसमोर आंदोलनाचा इशारा दिला आहे.