बीड शहराजवळील चऱ्हाटा फाटा परिसरातून एका तरुणाला तब्बल पंचवीस ते तीस जणांनी मारहाण करून उचलून नेल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ शनिवार, तेरा सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता समोर आला. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून मारहाण करणाऱ्यांचा शोध सुरू केला आहे. घटनेमुळे बीड शहरातही मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे.