23 ऑगस्टला रात्री 8:00 वाजता मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे वाडी हद्दीतील एमआयडीसी टी पॉईंट इथून हद्दपार आरोपीला वाडी पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान अटक केली आहे अटकेतील आरोपीचे नाव प्रीतम उर्फ सिंधू शर्मा असे सांगण्यात आले आहे. आरोपीला नागपूर शहर व ग्रामीण हद्दीतून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले होते. दरम्यान आरोपी कोणतीही परवानगी न घेता गुन्हा करण्याच्या उद्देशाने मिळाला असल्याने आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.