जळगाव येथील शनिपेठ पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणला असून संशयित आरोपीला भुसावळातून अटक केली आहे. चोरीस गेलेली बजाज पल्सर मोटारसायकल भुसावळ येथून जप्त करण्यात आली आहे. अशी माहिती पोलीस अधिक्षक कार्यालयाने सोमवारी २५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता प्रसिध्दीपत्रकानुसार कळविले आहे.