गडचिरोली अतिदुर्गम व मागास असून येथे एसटी बसेस व्यतिरिक्त इतर कोणतेही शासकीय दळणवळणाची साधन उपलब्ध नाही. त्यामुळे येथील नागरिकांना प्रवासाकरिता एसटी बसेस हा एकमेव आधार आहे. त्यामुळे शासनाने गडचिरोली जिल्ह्यासाठी अतिरिक्त सुसज्ज बसेस उपलब्ध करून द्यावे व चालक, वाहकांची तत्काळ भरती करावी, अन्यथा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी दिला आहे.