गणेश विसर्जन सोहळा पार पडल्यानंतर संगममाहुली येथील कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी कमी झाली होती. त्यामुळे विसर्जन केलेल्या गणेश मूर्ती या पात्राच्या कडेला आल्या होत्या. मंगळवारी सकाळी ७ ते ११ या वेळेत श्री. शिवप - तिष्ठान हिंदूस्थान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, गुरु अॅकॅडमी, संगम माहुली ग्रामपंचायत यांच्यावतीने संयुक्तपणे त्या मूर्तीचे पूर्नविसर्जन करण्यात आले. तसेच घाटाची स्वच्छता करण्यात आली.