संत निरंकारी मिशन आणि संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) च्या चामोर्शी शाखेतर्फे आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन भाजप प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी आमदार डॉ. देवराव होळी तसेच भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष व संत निरंकारी मंडळाचे झोनल अधिकारी किसनजी नागदेवे यांच्या हस्ते करण्यात आले.