३० सप्टेंबर २०२५ रोजी पंचायत समिती एटापल्ली येथे झालेल्या वार्षिक आमसभेत प्रचंड अव्यवस्था पाहायला मिळाली. नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागल्याने भारतीय कम्युनिस्ट पार्टीने गटविकास अधिकारी पंचायत समिती एटापल्ली यांचा तीव्र निषेध नोंदविला आहे. आमसभेत नागरिक आपली समस्या मांडत असताना ध्वनीव्यवस्था निकृष्ट असल्यामुळे कुणालाही कुणाचे बोलणे स्पष्टपणे ऐकू आले नाही. असा आरोप करण्यात आला.