पुरंदर तालुक्यातील पांगरे येथे बिबट्याने हल्ला केलेली दोनरेड्यांचा मृत्यू झाला यामध्ये शेतकऱ्याचं सुमारे 60 हजार रुपयांचे नुकसान झालय. या संदर्भात प्रत्यक्षदर्शी लोकांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात प्रकाश राजाराम काकडे यांच्या म्हशीच्या सुमारे एकवर्ष वयाच्या दोन रेड्या मारल्या गेल्या.रविवारी पहाटेच्या सुमारास पारड्यात बांधलेल्या या रेड्यांवर बिबट्याने हा हल्ला केला .यातील एक रेडी जागेवरच ठार झाली तर दुसऱ्या रेडीचा उपचार दरम्यान मृत्यू झाला .