आज दिनांक 8 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की गंगापूर तालुक्यातील वाळूज पोलीस ठाणे अंतर्गत गुरु धानोरा येथील पंचवीस वर्षे पासून रखडलेल्या रस्त्याच्या कामासाठी तरुण आत्मदहन करणार आहे, 2 शेतकर्यांच्या वादामुळे रस्ता रखडला आहे व मागील 25 वर्षापासुन गावकरी जीवघेणा प्रवास करत आहेत व शाळेतील मुलांनाही चिखलातून प्रवास करावा लागत आहे. यावेळी विशेष म्हणजे तिथे दवाखान्यात जाण्यासाठी बर्याच रूग्णांना प्राण गमवावे लागले आहेत.