तासगाव तालुक्यातील पाचवा मैल येथे पिस्टल बाळगल्या प्रकरणी तासगाव पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. सुशांत संजय चव्हाण (वय २२, रा. येळावी) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्टल, एक जिवंत काडतूस व दुचाकी असा १ लाख वीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे यांच्या पथकाने केली आहे. तासगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाचवा मैल, निमणी रोडवरील कार्यालयाजवळ एकजण संशयास्पदरित्या थांबलेला