सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठीची प्रभाग रचना अखेर जाहीर करण्यात आली आहे. ही माहिती महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी दिली. डॉ. ओंबासे यांनी बुधवारी (दि. ३ सप्टेंबर २०२५) दुपारी दोन वाजता पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, सोलापूर महानगरपालिकेची अधिकृत प्रभाग रचना निश्चित झाली असून ती आजपासून लागू होणार आहे. या प्रभाग रचनेनंतर महापालिका निवडणूक प्रक्रियेला गती मिळणार आहे.