आमदार अमोल खताळ यांच्यावरील हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना आज शुक्रवार दिनांक २९ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ४ च्या सुमारास सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधलेला आहे. यावेळी ते म्हणाले की, या घटनेत कोण सामील आहे हे आपण निश्चितपणे शोधून काढले पाहिजे. त्या जिल्ह्यातील एकूण राजकारण पाहता, अश्या अनेक घटना यापूर्वीही घडल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या हल्ल्याची दखल घेतली आहे. चौकशी केली जाईल दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.