सातारा रनर्स फौंडेशनतर्फे दरवर्षी आयोजित केली जाणारी आणि संपूर्ण देशभरात लोकप्रिय असलेली "जेबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉन" रविवार, दि. १४ सप्टेंबर २०२५ रोजी होणार असून, या मॅरेथॉनसाठी देशभरातून तब्बल ८००० धावपटूंनी नोंदणी केली आहे. आज शेंद्रे येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या कै. अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक संकुल येथे या भव्य एक्स्पोचे उद्घाटन श्रीमती छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले वहिनीसाहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले सर्वसातारकरांसाठी हा एक्स्पो खुला आहे.