२० ते २२ दिवस उलटून गेले तरीही श्रीनगर पोलिसांना सराईत गुन्हेगार सापडत नाही अस ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते महेश मोरे यांनी आज दिनांक ५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ च्या सुमारास सांगितलं. यावेळी महेश मोरे यांनी पोलिसांवर गंभीर आरोप देखील केले आहेत. तसेच आरोपीची माहिती देणाऱ्याला त्यांनी योग्य बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.