महाप्रज्ञा बुद्ध विहार, तिरोड़ा इथे आपल्या तिरोड़ा शहरात महाबोधि महाविहार मुक्ति आंदोलनाचे प्रनेते आदरणीय भंते विनाचार्य, भंते ज्ञानज्योति आणि भिक्षुसंघ यांचे रविवार, दिनांक 21 सप्टेम्बर 2025 ला आगमन होत असून, त्यांच्या सन्मानार्थ भव्य धम्मध्वज रॅली व धम्मदेशना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने कार्यक्रमाची सविस्तर रूपरेषा व तयारी याबाबत चर्चा करण्यासाठी सर्व धम्मबंधूंची पूर्वतयारी सभा महाप्रज्ञा बुद्ध विहार तिरोडा येथे आयोजित करण्यात आली होती.