धुळे तालुक्यातील वडेल येथील श्री संत बाळूमामा मंदिर परिसरात मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात भव्य त्रिशूळ स्थापना सोहळा संपन्न झाला. यानिमित्त संपूर्ण गावातून ढोल-ताशांच्या गजरात आणि जयघोषात भव्य मिरवणूक काढण्यात आली. या सोहळ्यात भाविकांनी आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.