माळशिरस येथे घरगुती कारणातून तरुणाला मारहाण करण्यात आली. ही मारहाण सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास झाली. नवनाथ शंकर जगताप (वय ३५, रा. माळशिरस) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. नवनाथ हा सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास त्याच्या राहत्या घराजवळ थांबला होता. त्यावेळी त्यास गणेश इंगवले, इतर दोन जणांनी कोयता तसेच लाथाबुक्यांनी मारहाण करून जखमी केले. यात डोक्याला आणि पायाला जखम झाल्याने त्याला उपचारासाठी दाखल केले.