फिर्यादी किरण अर्जुन पाटील (वय 24, रा. रोहीलागड, ता. अंबड, जि. जालना) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे पिकअप (क्र. MH 20 GZ 2946) मधून तब्बल 30 नग रॉयल इनफिल्ड कंपनीचे पार्ट्स असा एकूण 36 हजार रुपयांचा माल चोरीला गेला. ही घटना दिनांक 7 सप्टेंबर रोजी रात्री 10.00 ते 10.30 च्या सुमारास येरमाळा ब्रिज ते चोराखळी येथील HP पेट्रोल पंपादरम्यान घडली. अज्ञात व्यक्तीने वाहनावरील ताडपत्री फाडून हा माल चोरून नेल्याचे उघड झाले आहे.