गुरुवारी 12 जून रोजी रात्री 11 वाजता रोहा तालुक्यात वारा वादळासह पाऊस पडला. या पावसात रोहा कोलाड रोडवरील रोठ गावच्या हद्दीतील रस्त्यावर असणारी झाडे विद्युत वाहिन्यांवर पडल्याने रात्री परिसरातील बत्ती गुल झाली. रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या या पोलवर हे झाड पडले मात्र रस्त्यावर वर्दळ नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र परिसरातील नागरिकांना रात्रभर काळोखात रात्र काढावी लागली. आज सकाळी ही झाडे बाजूला करीत विद्युत वाहिन्या दुरुस्तीच्या कामाला महावितरण कर्मचारी यांनी सुरुवात आहे.