पोलीस स्टेशन मौदा अंतर्गत येत असलेल्या चिरव्हा येथे तलवार घेऊन फिरणाऱ्या गुन्हेगार यास गुप्त माहितीच्या आधारे मौदा पोलिसांनी अटक केल्याची घटना घडली. याबाबत वृत्त असे की कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देत आरोपी गुन्हेगार चिरव्हा येथे तलवार घेऊन फिरत होता. त्यामुळे गावातील लोकांमध्ये दहशत निर्माण झाली होती. याची माहिती मिळताच मौदा पोलिसांनी सापळा रचून आरोपीस तलवार सह अटक करण्यात आली. आरोपीविरुद्ध मौदा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.