रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. आनंदराज आंबेडकर साहेब यांचा नागपूर व अमरावती येथे संवाद दौऱ्या दरम्यान त्यांच्या प्रमुख उपस्थितीत रवि भवन नागपूर येथे पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रदेश अध्यक्ष किरण भाऊ घोंगडे तथा विदर्भ अध्यक्ष प्रफुल शेंडे यांच्या मार्गदर्शनात, यवतमाळ जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील चिंचोलकर यांच्या नेतृत्वात यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन सेनेमध्ये प्रवेश केला.