वाशीम शहरातील विविध गणेश मंडळांचे बाप्पा गणेश विसर्जन मार्गाने मार्गक्रमण करत संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत श्री बालाजी मंदिरा जवळील देव तलावात गणेश मूर्तीच विसर्जन होणार आहे. जिल्ह्यात आज ४२० सार्वजनिक गणेश मंडळांकडून बाप्पांना भावपूर्ण निरोप देण्यात येत आहे. हा विसर्जन सोहळा शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे.