सायंकाळच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गा जवळुन म्हशींचा झुंड जात असताना राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या नाल्याच्या पॅचमध्ये एक म्हैस पडली. अनेकांनी त्या म्हशीला काढण्याचा प्रयत्न केला मात्र ते काढणे शक्य नव्हते. या घटनेची माहिती मुरमाडीचे सरपंच शेषराव वंजारी यांना होताच त्यांनी स्वखर्चाने जेसीबी बोलावून सिमेंट नाल्याला फोडले. जवळपास ३ तासानंतर नाल्यात पडलेल्या म्हशीला जीवनदान देण्यात यश आले आहे. विशेष म्हणजे ३ तासाच्या प्रयत्नानंतर म्हैस नाल्यातून सुखरूप बाहेर पडली व धावत पळत गेली.