पोलीस स्टेशन कूही अंतर्गत येत असलेल्या माळणी शिवारात असलेल्या पाइप कंपनीच्या आवारातील टाक्यात पडून कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. सोहनलाल शालीकराम कुंभरे वय 35 राहणार खैरलांजी जिल्हा बालाघाट मध्यप्रदेश असे मृतक कामगाराचे नाव आहे .मृतक सोहनलाल हा तीन दिवसांपूर्वीच सदर कंपनीत कामाला आला होता.घटनेची माहिती कूही पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी साठी कूही येथे पाठविला.अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.