विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेकऱ्यांचा ७/१२ करु या कोरा कोरा कोरा या दिलेल्या आश्वासना जागून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्ज माफी द्यावी व शेतकऱ्यांना कर्जातुन मुक्त करावे, असा संदेश देणारा अनोखा बैल पोळा सण साजरा करण्यासाठी शेतकऱ्यांनी बैलाला तोरणाखाली आणून संदेश दिला. बैलांच्या अंगावर ७/१२ कोरा कोरा असे लिहुन महाराष्ट्र सरकारला दिलेल्या आश्वासनाची आठवण करुन देत बैल तोरणाखाली आणून जाहीर निषेध व्यक्त केला.