आज दिनांक 26 सप्टेंबरला जिल्हा परिषद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय माणिकवाडा येथील विद्यार्थ्यांनी श्री संत फकीरजी महाराज मंदिर धनज येथे पथनाट्यातून शेतकऱ्यांची व्यथा मांडली. शेतकऱ्यांची परिस्थिती किती हलाखीची आहे हे त्यांनी आपल्या पथनाट्यातून दाखवून दिले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक देऊळकर सर यांच्यासह सर्व शिक्षकांची, विद्यार्थ्यांची व गावातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.