मुंडीपार मार्गाने ट्रॅक्टर ट्राॅली भडंगा गावाकडे भरधाव वेगात येत असलेल्या ट्राॅलीच्या चाकाखाली सायकलस्वाराचा जागीच मूत्यु झाला.ही घटना मंगळवारी (ता ०९) सकाळी १० वाजताच्या दरम्यान भडंगा फाट्याजवळ घडली.मृत व्यक्तीचे नाव ओमराज टेंभुर्णीकर (वय ६५ वर्षे, रा. भडगा, ता. गोरेगाव)असे आहे.मृतक हा भडंगा गावातून सकाळी १० वाजता सायकलने बसस्थानकावर येत होता.दरम्यान ट्रॅक्टर मुंडीपार मार्गाने लाल विटा ट्रॅक्टर ट्रॉलीत भरून भरधाव वेगाने भडंगा गावात येत असताना ट्रॉलीच्या मागच्या चाकात दबून मृत्यू झाला.