राहुरी तालुक्यामधे गणेश उत्सवादरम्यान डीजे वाजवताना नियमांचे उल्लंघन झाल्यास त्या मंडळावर कारवाई करण्याचा इशारा डीवायएसपी जयदत्त भवर यांनी देताच अनेक गणेश मंडळांच्या कार्यकर्तांनी आमदार शिवाजी कर्डिले यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांच्या समवेत बैठक घेतली "जर कुठल्याही मंडळावर पोलिस केस झाली, तर ती पहिली माझ्यावर व्हावी," असे ठाम विधान कर्डिले यांनी करत मंडळांच्या पाठिशी असल्याचा विश्वास त्यांनी दिला आहे. आज शनिवारी सायं राहुरी शहरातील मुळा प्रवरा कार्यालयात हि बैठक पार पडली.