हिंगोली: (दि.06) रोजी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी NQAS नामांकन प्राप्त प्राथमिक आरोग्य केंद्र गिरगाव येथे भेट देऊन पाहणी केली. आरोग्य विषयक कार्यक्रमाचा आढावा घेतला. आरोग्य संस्था एनकॉस प्राप्त झाल्यामुळे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या व समाधान व्यक्त केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. वैजनाथ सूर्यवंशी, डॉ. डी.बी. भारती व कर्मचारी उपस्थित होते