बुलढाणा जिल्ह्यात दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित केला जातो.त्याअन्वये, सप्टेंबर महिन्याचा लोकशाही दिन मंगळवार, 2 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे आयोजित केला आहे. तक्रारदारांनी स्वतः उपस्थित राहावे. जर उपस्थित राहणे शक्य नसेल, तर तक्रारी रजिस्टर पोस्टाने लोकशाही दिनाआधी जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवाव्यात. ही माहिती प्र. निवासी उपजिल्हाधिकारी श्री. सदाशिव शेलार यांनी दिली आहे.