निलंगा तालुक्यातील कलांडी गावात २९ सप्टेंबर रोजी रात्री साडेदहा ते अकराच्या दरम्यान ३-४ वेळा आवाज झाला होता. त्यामुळे नागरिक भूकंप होण्याच्या भीतीमुळे घराबाहेर येऊन बसलेले होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी निलंगा तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांना तातडीने कलांडी गावात भेट देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार तहसीलदार श्री. कुलकर्णी यांनी रात्रीच कलांडी येथे भेट देवून नागरिकांशी संवाद साधला. तसेच गावात भूकंप झाल्याची नोंद नसल्याने नागरिकां