एक सप्टेंबरला दुपारी बारा वाजताच्या सुमारास पोलीस ठाणे वाडी हद्दीतील आंबेडकर नगर येथे राहणारा 21 वर्षीय शुभम मुळे हा त्याच्या घरी इलेक्ट्रिकचे काम करीत असताना त्यांना अचानक करंट लागल्याने तो बेशुद्ध झाला त्याला उपचाराकरिता मेयो रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून घोषित केले. या प्रकरणी प्राप्त वैद्यकीय सूचनेवरून पोलीस स्टेशन वाडी येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.