अनंत चतुर्दशीनिमित्त दि. ६ सप्टेंबर रोजी भुसावळसह परिसरात आपल्या लाडक्या बाप्पाला भाविकांनी भक्तिमय वातावणात निरोप दिला. गणपतीला बाप्पाला निरोप देतांना भविकांचे डोळे पाणवले होत. आज सकाळपासूनच गणपती विसर्जनाला सुरुवात झाली. घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मंडळातील गणेश विसर्जन ढोल ताशांच्या गजरात पार पडले. यानिमितात तापी नदीवर गणपती विसर्जनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, भाविकांच्या सुरक्षेसाठी नदीवर बॅरेकेटिंग करण्यात आली होती. तसेच लाईफ गार्ड देखील तैनात करण्यात आले होते.